राज्यातील आघाडी शासनाच्या विरोधात अमळनेर भाजपाचे "महाराष्ट्र बचाव " आंदोलन "माझे अंगण-माझे रणांगण" आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी

----------------------------------------------------------------------
              - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------
अमळनेर -
राज्यातील कोरोना 
बाधित रुग्णाची वाढती संख्या रोखण्यात राज्यातील आघाडी सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ अमळनेर भारतीय जनता पार्टी तर्फे तालुक्यात ग्रामीण भागात १०४ व शहरी भागात ४९ बूथवर मा.आ.स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात "महाराष्ट्र बचाव" आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनकर्त्यानी काळा मास्क व हातात फलक घेवून राज्य शासनाचा निषेध नोंदविला.
           राज्यात गेल्या आठवड्या पासून दररोज सरासरी १००० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत राज्य देशात क्रमांक १ वर पोहचले असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात शासनाला मोठे अपयश आले आहे. लॉकडॉउन कालावधीत शेतकरी,शेतमजूर,बारा बलुतेदार, रिक्षा चालक,टैक्सी चालक,छोटे दुकानदार तसेच समाजातील इतर दुर्लक्षित वर्गाची बिकट आर्थिक स्थिति निर्माण झाली असून त्यांच्या करीता राज्य शासनाने ५०,००० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करावी   अशी मागणी आंदोलन कर्त्यानी केली.
मा.आ.वाघ अमळनेरातील आंदोलनात
     यावेळी मा.आ.स्मिता वाघ यांच्या समवेत अॅड. ललिता पाटील,जिल्हा चिटणीस महेश पाटिल,माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड.व्ही.आर.पाटील,        बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,बाजार समिती संचालक पराग पाटिल,विजय राजपूत,राकेश पाटिल,महेंद्र महाजन,अमोल माळी, निखिल पाटिल,चंद्रकांत कंखरे,योगीराज चव्हाण,समाधान पाटिल,आदि उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.