ईद निमित्त व.ता.आबा –डी.डी.नानांकडून गरीबांना ११ हजाराची रोख मदत

-------------------------------------------------------------------------- 
                - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------
अमळनेर–
कोरोनामुळे आर्थिक मंदीचे चटके सोसत असणाऱ्या खऱ्या गोरगरीबांना ईद निमित्त मदत करण्यासाठी दैनिक पुण्य प्रतापचे संपादक व.ता. आबा पाटील व कार्यकारी संपादक डी.डी नाना पाटील यांनी त्यांच्याकडून ११ हजार रुपये रोख स्वरूपात अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शकील काझी यांचेकडे आज सायंकाळी दिले.
     अॅड. शकील काझी हे येथील जडीबुटीवाले सय्यद आरिफ व रफियोद्दीन( रफा दादा, चुनाभट्टी) ह्या कार्यकर्त्यांच्या मार्फत गरजूंना लागलीच मदतीची रक्कम वाटून देणार आहेत.
   यावेळी पत्रकार पांडुरंग पाटील तसेच पप्पू पाटील आर्डीकर हे देखील उपस्थित होते.
      श्री व. ता.आबा व डी.डी. नाना यांनी या आधीसुद्धा कोरोनात अडचणीत आलेल्यांना मदत केली आहे.
    पत्रकार व.ता.आबा पाटील यांनी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ता अॅड. शकील काझी यांना बोलवित गोरगरिबांपर्यंत तुमच्या  पद्धतीने ही आर्थिक मदत पोहोचविण्याचे सांगितले आहे.
--------–-----------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.