लॉकडाऊन काळातही कैलास पाटील व सहकारी देताहेत अखंडीत पार्सल सर्व्हिस मेडिकल्स व आजारी रूग्णांना जळगाव येथून औषधे मिळण्याची झाली सोय

Wednesday, May 20, 2020

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------------
             - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत गरजू रूग्णांना अमळनेर येथे उपलब्ध न होणारी औषधे जळगाव येथून आणून देण्याची सोय श्री कैलास पाटील व सहका-यांच्या डेली पार्सल सर्व्हिसमुळे झाली. या आपत्कालीन सेवेबद्दल शहरातील मेडिकल दुकानदार,डॉक्टर्स व रूग्ण यांनी कैलास पाटील व सहका-यांना धन्यवाद दिले आहेत.
          श्री कैलास पाटील यांचा अमळनेर ते जळगाव असा डेली पार्सल सर्व्हिस हा व्यवसाय आहे. इतर वेळी शहरातीलव्यावसायिक  जळगाव येथून काही वस्तू मागविणे अथवा पोहोचविणे या कामासाठी या डेली सर्व्हिसचा वापर करीत असतात. कैलास पाटील यांच्या समवेत त्यांचे सहकारी प्रमोद पाटील,दिनकर पाटील,विश्वास पाटील,संतोष पाटील,अनिल पाटील हे आपल्या तीन वाहनातून वस्तूंची ने-आण करून वेळेत व सुरक्षित सुविधा माफक दरात उपलब्ध करून देत असतात. दररोज अमळनेर येथून जळगाव येथे जाणे व रात्री वस्तू घेऊन येणे हा दररोजचा नित्यक्रम ठरलेला आहे. सकाळी लवकरच आणलेल्या वस्तू त्या-त्या ग्राहकापर्यंत पोहोचविण्यात येतात.या डेली सर्व्हिसची नेहमीच्या ग्राहकांना सवय झाली आहे. 
      आता या लॉकडाऊनच्या कालावधीत तर या डेली सर्व्हिसचे महत्व अधिकच लक्षात आले असल्याचा अनुभव व्यावसायिकांनी घेतला आहे.सर्वत्र लॉकडाऊन, जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद होती.त्यामुळे बाहेरून औषधे व इतर वस्तू वेळेत पोहोचणे अशक्य वाटत होते. पण कैलास पाटील व सहका-यांनी अखंडीत दिलेल्या सुविधेमुळे हे काम शक्य झाले आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिक,मेडिकल दुकानदार, डॉक्टर्स व रूग्ण यांनी कैलास पाटील व त्यांच्या सर्व सहका-यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
----------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines