---------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील कापूस खरेदी केंद्रास परवा अचानक लागलेल्या आगीमुळे अमळनेर येथे कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली होती. पण आता अमळनेर तालुक्यात नोंदणी केलेल्या शेतक-यांची कापूस खरेदी उद्या पासून पारोळा येथे सुरु होणार असल्याची माहिती मा.आ.स्मिता वाघ,आ.अनिल भाईदास पाटील व बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल बापू पवार यांनी दिली आहे .अमळनेरचे केंद्रास आग-खरेदी बंद
तालुक्यासाठी निर्धारित करण्यात आलेले लामा जिनर्स येथील केंद्राचे आगीमुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे केंद्रावरील कापूस खरेदी बंद करण्यात आली होती.त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठीच वाढ झाली होती.ह्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मा.आ.स्मिता वाघ ,आ.अनिल भाईदास पाटिल यांनी जिल्हा उपनिबंधक व कापूस फेडरेशनचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली. त्यानुसार कृषी उपन्न बाजार समिती अमळनेर येथे नोंदणी केलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी नोंदणी नुसार पारोळा येथील केंद्रावर करण्यात येणार आहे.
शेतक-यांनी सहकार्य करावे-आवाहन
अमळनेर येथील कापूस खरेदी केंद्रावर पुढील व्यवस्था लवकरच करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मा.आ.स्मिता वाघ, आ.अनिल भाईदास पाटिल, सभापती प्रफुल्ल बापू पवार व बाजार समितीचे संचालक यांनी केले आहे.



