अमळनेर येथील मका व ज्वारी शासकीय धान्य खरेदी सुरूच शेतकऱ्यांमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण करणाऱ्यांच्या नादी लागू नका - आ. अनिल पाटील

Monday, June 1, 2020

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------------------
          - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------
अमळनेर -
शासनाने येथे सुरू केलेली मका व ज्वारी शासकीय खरेदी सुरूच असूनशेतकऱ्यांमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण  करणाऱ्यांच्या व ऐकीव माहिती पसरवणारे राजकीय कार्यकर्ते यांच्या नादी शेतकऱ्यांनी लागू नये असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे.
संभ्रम निर्माण करू नका,स्वतःचे पितळ उघडे पडेल
    यापूर्वी ३०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून टप्प्या -टप्प्याने शेतकरी बोलावण्यात येत असून मोजमाप सुरू आहे. मात्र शासकीय सुट्या व काही तांत्रिक अडचणी असतांना केंद्र बंद झाल्याचा गैरसमज पसरवण्याचा उद्योग करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र अशी परिस्थिती नाही.गेल्या सत्ता काळात खरेदी केंद्र कसे चालवले गेले ते आम्हांला माहिती आहे. त्यांनी किती बोंब पाडली हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगून स्वतःच्या सत्तेत झालेले पितळ उघडे करू नये. खरेदी सुरूच राहील व नोंद झालेल्या शेतकऱ्यांचे धान्य रितसर मोजले जाईल.  त्यांनी चिंता करू नये आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे.
खरेदी केंद्र सुरूच
             शुक्रवारी केंद्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी शनिवार व रविवार शासकीय सुट्या असल्याने केंद्र बंद होते. सोमवारी पुन्हा सुरू झाले असून आतापर्यंत ७०० क्विंटल मका व ज्वारी खरेदी झाली आहे. दररोज १० शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मोबाईल नंबरवर एसएमएस/फोन करून मोजमाप करण्यासाठी आधीच्या दिवशी कळवले जाते. 
बारदान उपलब्ध
       दरम्यान शासनाकडे बारदान नसल्याने देखील खरेदी करण्यास अडचण होती. अखेर तहसीलदार मिलिंद वाघ यांनी २ हजार बारदान उपलब्ध करून दिले असून अजून बारदान उपलब्ध करण्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल याची काळजी विरोधकांनी करण्याची गरज नाही. हे सरकार खरेदीसाठी सक्षम आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन संदेश देऊन बोलावण्यात येईल त्यानुसारच शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
 खरेदी दर
 मका हमीभाव १७६०/- रुपये 
 ज्वारी हमीभाव २५५०/-रुपये
-----------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines