लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत साध्या पद्धतीने विवाह चि.सौ.का.रसिका व चि.राघवेंद्र यांनी केली वैवाहिक जीवनास सुरूवात

-------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोना आजार व त्यापासून बचाव व्हावा यासाठी उपाय म्हणून सुरू करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे समाज जीवनातील सर्व संदर्भच बदलून गेले आहेत. हिंदु जीवन पद्धतीत अत्यंत महत्वाचा असलेला संस्कार म्हणजे विवाह संस्कार. याआधी अतिशय झगमगाटात पार पडणारा हा कौटुंबिक कार्यक्रम आता घरगुती वातावरणात आणि कमी संख्येत पार पाडावा लागत आहे. असाच एक विवाह सोहळा सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अमळनेर येथील ढेकू रोडवरील कृषी विकास कॉलनीत नुकताच पार पडला.
      येथील महेंद्र विनायक बाकले यांची कन्या चि.सौ.का.रसिका व नगर येथील मधुकर कोकणे यांचे चिरंजीव चि.राघवेंद्र यांचा शुभविवाह घरगुती वातावरणात साध्या पद्धतीने पार पडला. दोन्ही परिवारांनी विवाह समारंभ साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लग्न विधी देखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. येथील कृषी विकास कॉलनीतील रहिवासी महेंद्र विनायक बाकले यांची कन्या चि.सौ. का.रसिका BCA(Computer) व चि.राघवेन्द्र B.Tech (Chemical) या उच्च शिक्षित दांपत्याने आपल्या मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीने आपल्या वैवाहिक जीवनास सुरूवात केली. यावेळी दोन्ही परिवारातील  सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते सुनील अहिरराव उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.