शहरातील दुकाने दि. ७ जूनपासून दररोज ९ ते ३ या काळात सुरू राहतील - आ. अनिल पाटील

--------------------------------------------------------------------------
          - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील बन्सीलाल पॅलेसमध्ये व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनची बैठक आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच  संपन्न झाली.  त्यात व्यासपीठावर लालचंद सैनानी, बिपीन कोठारी व रमेशशेठ जीवनानी आदी उपस्थित होते. 
आमदारांचे बैठकीत आश्वासन
      यावेळी किराणा आणि कापड दुकान व्यापारी यांच्यात होलसेल व रिटेल याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी लालचंद सैनानी,बिपीन कोठारी,रमेश जीवनानी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच दोन्ही असोसिएशनच्या व्यापारी बांधवांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी आमदार अनिल पाटील यांनी गेल्या दोन - तीन महिन्यात व्यावसायिकांची लॉकडाऊनमुळे मोठी कोंडी झाली आहे. हे नुकसान पाहता लवकरच दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
प्रशासनाशी चर्चेतून झाला निर्णय
     
त्यानुसार आज सायंकाळी प्रशासनासोबत बैठक होऊन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यासाठी दुकानावर येणारा ग्राहक व स्वतःची सुरक्षा याबाबत सर्वांनी नियम पाळावेत. कुणीही सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करणार नाही याबाबत काळजी घ्यावी. त्यासाठी ग्राहकांना सॅनिटायजर देणे यासह दुकानात येणाऱ्या ग्राहकाला मास्क बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणीही आपला व्यवसाय करतांना आढळले तर कठोर कारवाई करण्यात येईल. सोशल डिस्टनसिंगचे नियम बंधनकारक असावे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. दररोज सकाळी ९  ते दुपारी ३ या वेळेत दुकाने  उघडी राहतील असा निर्णय आज सायंकाळी अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  हा निर्णय दि.७ जूनपासून अंमलात येणार आहे. हे लॉकडाऊन हे ३० जून पर्यंत असून तोपर्यंत हा नियम लागू रहाणार असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. व्यापारी बैठकीत लवकरच दुकाने उघडण्याबाबतचा निर्णय होईल असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी दिले होते ते शुक्रवारी पूर्ण झाले. गुरुवारी झालेल्या बैठकीस  खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडा, संचालक नीरज अग्रवाल, विजय जैन यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.