सर्वत्र कोरोनाची गंभीर परिस्थिती,दुकाने उघडणार असली तरी नियमांचे पालन करा माजी आमदार साहेबराव पाटील यांचे जनतेला आवाहन

---------------------------------------------------------------------------
        - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
कोरोनाची लागण अमळनेर शहर व तालुक्यात पसरल्याने सर्वत्र  परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाचे संक्रमण कसे होते हे समजत नसल्याने आणि  रुग्णांसाठी आता रुग्णालयात देखील जागा मिळत नाही म्हणून  शासनाच्या नियमांचे पालन करा आणि दुकाने उघडत असली तरी बाजारात अनावश्यक फिरू नका असे आवाहन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जनतेला  केले आहे 
        शहरातील सर्वच भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. नागरिकांनी मास्क न लावल्यामुळे,सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न केल्यामुळे त्याचा कॅरियर मार्फत प्रसार होत आहे. त्यामुळे आजारी  आणि मधुमेह असलेले व वृद्ध व्यक्तींना लवकर ग्रासले जात असून त्यातील अनेकांचा मृत्यू ओढवत आहे. घरातील जेष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्ती कोरोनामुळे आपल्यातून हिरावून  नेत आहेत. रूग्ण संख्या वाढल्याने रुग्णालये देखील फुल्ल होत असून काही डॉक्टर देखील कोरोनाग्रस्त होत आहेत.  त्यामुळे नागरिकांनी बाजारात आणि दुकानांवर खरेदीला जातांना मास्क किंवा रूमालाचा अवश्य  वापर करावा. सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे तसेच दुकानदारांकडे सॅनिटायझर नसेल तर त्याच्याकडून माल खरेदी करू नये असेही आवाहन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केले आहे.
--------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.