जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पदभार स्विकारला

--------------------------------------------------------------------------
        - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
जळगाव -
जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी बदलून आलेले श्री अभिजित राऊत यांनी आज सायंकाळी पदभार स्विकारला.

  परिचय
  सांगली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले  अभिजित राऊत मुळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मात्र बुलढाणा येथे झाले.तर आयआयटी रूकरी येथून  जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सन २०१३ च्या बॅचचे आयएएस असलेले श्री राऊत तरुण व संयमी स्वभावाचे अधिकारी  अशी त्यांची ओळख आहे. सुरूवातीला परिविक्षाधीन कालावधीत सांगली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी,नंतर केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयात असिस्टंट सेक्रेटरी,त्यांनंतर नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व तळोदा येथे आयटीडीपी प्रकल्पाचे अधिकारी म्हणून सेवा बजावली असून, सांगली जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून अडीच वर्षांपासून ते सेवारत आहेत.
आज घेतला पदभार
     जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या बदलीची व अभिजित राऊत यांच्या नियुक्तीची चर्चा मागील ४- ५ दिवसांपासून सुरू होती. पण बदलीचे आदेश मिळाले नव्हते. अखेर काल राऊत यांना आदेश प्राप्त झाले आणि आज सायंकाळी आपला पदभार स्विकारला. यावेळी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ.बी.एन.पाटील,महापालिका आयुक्त सतिषकुलकर्णी,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर,सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल पाटील,
जिल्हा सह निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे आदींसह महसूल,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.