भाजीपाला लिलाव आता होणार शहराबाहेर, नियम मोडणा-या दुकानांवर कारवाईचे संकेत लोकप्रतिनिधी व अधिका-यांच्या प्रदिर्घ बैठकीतील निर्णय

------------------------------------------
- * जाहीरात * -
सेल.       कुलर सेल.   सेल
   ------------------------------------------   
अमळनेर -
शहरासह आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने लोकप्रतिनिधी व शासकीय अधिका-यांच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.शहरात होणारा भाजीपाला लिलाव शहराबाहेर करण्यात यावा.तसेच भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले यांना १७ प्रभागात नेमून द्यावे.किराणा दुकानदारांनी घरपोच सेवा सुरू करावी व नियम मोडणा-या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
           अनेकदा सुचना देऊनही नागरिक सोशल डिस्टंन्सिंग व इतर नियमांचे पालन करत नाही. मास्क अथवा रूमाल न बांधता गावात फिरणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ही गंभीर बाब बनली आहे. नागरिक भाजीपाला व किराणा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. भाजीपाला विक्रेते न्यु प्लॉट भागात मोठ्या संख्येने असल्याने नागरिकांची गर्दी येथेच होत असते. यावर उपाय योजनांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय या सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत घेण्यात आले.सध्या सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्याबाबतही विचार विनिमय करण्यात आला. शहरातील सराफ बाजार बंद आहे.सदर कॅन्टोमेंट भागाची पाहणी करून या भागातील दुकाने सुरू करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा असेही बैठकीत ठरले. प्रशासनाने नियम मोडणा-या विरूध्द कारवाईचे संकेत दिले आहेत पण त्याची कडक अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.शासनाने दिलेले निर्देश हे जनतेच्या आरोग्यासाठी आहेत. हे कायदेशीर नियम केवळ नावापुरते असू नयेत तर नियम मोडणा-यांना त्याचा धाक वाटला पाहिजे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकातूंन व्यक्त होत आहे.
बैठकीस यांची होती उपस्थिती
     उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आ.अनिल पाटील,
मा.आ.डॉ.बी.एस.पाटील, मा.आ.साहेबराव पाटील, मा.आ.शिरीष चौधरी, मा.आ.स्मिता वाघ,उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलींद वाघ, नपाच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,नपाचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांची उपस्थिती होती.
---------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.