तालुक्यातील ८ मंडळातील ५ हजार शेतकऱ्यांना लाभले पीक विम्याचे कवच

---------------------------------------------------------------------
          - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून गुरुवारीच जिल्हा बँक व इतर बँकांना पिक विम्याची यादी प्राप्त झाली आहे. रक्कम बँकांच्या खात्यावर टप्प्या टप्प्याने जमा होणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली असून यात भुईमग,मका, सोयाबीन,ज्वारी या पिकांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे.  
         सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये,खात्यावर पैसे जमा झाल्याशिवाय बँकेत जाऊ नये, सर्व रक्कम लवकरच जिल्हा बँकेच्या खात्यात जमा होणार असून त्याची शेतकऱ्यांनी वाट पहावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये सुरक्षा असावी हे पहाता अनुदान प्राप्त झाल्यानंतर सर्व बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहेत. त्याचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल प्रत्येक गाव निहाय पीक विम्याची यादी प्रकाशित होईल. तालुक्यातील ८ महसूल मंडळात पीक विम्याचा लाभ मिळाला असून आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत तालुक्यात अतिवृष्टी आणि पाऊस झाला असताना गावे लाभापासून वंचित होती. काही गावांना यापूर्वी पावसाळी अवकाळी अनुदान शेतक-यांना  मिळाले असून आता पीक विम्याचे कवच ५ हजार शेतक-यांना मिळाले आहे.  तालुक्यात एकूण २८ हजार शेतकरी असून त्यात कापूस पीक विमा अद्याप मंजूर झालेला नाही त्याबाबत सरकार लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
---------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.