लायन्स क्लब अमळनेरतर्फे ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर व फिल्टर भेट

------------------------------------------------------------------------
           - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील ग्रामीण रुग्णालयात येणारे सर्व रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर तात्काळ लायन्स क्लब अमळनेर तर्फे ग्रामीण रुग्णालय अमळनेरला वॉटरकुलर व वॉटरफिल्टर भेट देण्यात आले.
             सदरचा वॉटरकुलर व फिल्टर बसवण्यासाठी क्लबला एकूण ६१०००/- रुपये खर्च आला असून सर्व खर्च लायन्स क्लबचे सदस्य सुनील लुनावत, एम.एस.जैन ग्रुप तर्फे करण्यात आला.
             वॉटरकुलर व फिल्टरचे उद्घाटन आज दि.२८ जून रोजी  आमदार अनिल पाटील  व जि.प. सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार अनिल पाटील यांचा सत्कार लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य डॉ.युसुफ पटेल यांच्या हस्ते करण्यात आला व जयश्री पाटील यांचा सत्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला, नंतर लायन्स सदस्य सुनील लुनावत यांचा सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी लायन्स क्लब तर्फे ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धा सर्व डॉक्टर्स व नर्सेस यांचा सत्कार करण्यात आला.
      या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.प्रकाश ताडे, डॉ. संदीप जोशी तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी बजरंग अग्रवाल, डॉ.युसुफ पटेल, येझदी भरूचा, योगेश मुंदडा, जितेंद्र जैन, पंकज मुंदडा, मिलिंद नवसारीकर, रवींद्र जैन,अनिल रायसोनी,सुशील पारेख,महेंद्र पाटील, महावीर पहाडे, चेतन जैन, प्रसन्ना पारेख, अजय हिंदुजा व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कोरोना योद्धा  कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लबचे सेक्रेटरी प्रसन्ना पारेख यांनी केले.
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.