-------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
अमळनेर - केंद्र व राज्य पातळीवरील यंत्रणेद्वारा पोलीस स्टेशनच्या कार्यवाही बाबतच्या अहवालाचे मुल्यांकन करण्यात आले व त्यात अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हे राज्यातील सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले आहे. सदरचे मानांकन हे मागील सन २०१९ या वर्षातील कामकाजाची पाहणी करून व कार्याचे निकष पुर्ण केल्यामुळे मिळाले आहे. देशात ३६ तर राज्यातील तीन पोलीस स्टेशनचा बहुमान

मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, हे दरवर्षी सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशन निवड करत असते. या निवडीसाठी काही निकष लावण्यात येतात. यात महिलांविषयी,मालमत्तेसंबंधी व इतर मायनर कायद्यान्वये दाखल गुन्हे, निर्गती, पोलीस भ्रष्ट्राचार केसेस,पोलीस स्टेशन वास्तु व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वागणुक, कार्यक्षेत्रातील जनतेच्या पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचा-यांबद्दलच्या प्रतिक्रियांबाबत व इतर निरीक्षणाच्या आधारे देशातील १५५७९ पोलिस स्टेशनपैकी ७९ पोलीस स्टेशनची निवड करून वरील बाबींचा सर्वे करून देशातुन सर्वोत्तम १० व प्रत्येक राज्यातुन एक असे ३६ पोलीस स्टेशनची सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशन म्हणुन निवड करण्यात आली आहे. यात तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनने राज्यात बहुमान प्राप्त केला आहे. या यशाबद्दल मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला व सर्व कर्मचारी वर्गाचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्यासह वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

सर्व कर्मचारी व जनतेच्या सहकार्यामुळे मिळाला बहुमान - सपोनि राहुल फुला
जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी कै.राजेंद्र ससाणे यांनी क्राईम मिटींग, प्रत्यक्ष भेट व इतर माध्यमातून पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. कार्यक्षेत्रातील राजकीय पदाधिकारी,
लोकप्रतिनिधी,नागरिक यांनी नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्ही चांगले काम करू शकलो.पोलीस व जनता यांच्यात समन्वय साधून विविध उपाय योजना केल्या त्याचा परिणाम नागरिकांचा आमच्यावर विश्वास वाढला. यामुळे सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशनचा बहुमान आम्हाला मिळाला. याचे संपूर्ण श्रेय कर्मचारी व नागरिकांचे आहे अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी व्यक्त केली आहे.
----------------------------------------------------------------
No comments
Post a Comment