----------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
अमळनेर - जळगाव जनता सहकारी बॅंकेच्या विविध ग्राहक सेवेप्रमाणे फिरते एटीएम सेवा लोकप्रिय होत आहे. अमळनेर शहरात नुकतेच फिरते एटीएम वाहन आले होते. या सेवेस ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी या एटीएम मधून पैसे काढून या योजनेचा लाभ घेतला. जळगाव जनता सहकारी बॅंकेच्या वतीने विविध ग्राहक उपयोगी योजना राबविण्यात येत असतात. या सर्वच योजनांना ग्राहकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो.एटीएम सेंटरला कधी गर्दी असते तर काही एटीएममध्ये रक्कम नसल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागते. यावर उपाय म्हणून बॅंकेने मुख्य शाखेतून फिरते एटीएम वाहन योजना सुरू केली आहे. अमळनेर येथे हे वाहन आले असता शहरातील विविध ठिकाणी थांबून नागरिकांना एटीएम सेवा उपलब्ध करून देत होते.

अमळनेर शहरात या सेवेचा शुभारंभ स्वामी नारायण चौकात करण्यात आला.यावेळी प्रथम पाच ग्राहकांचा बॅंकेचे स्थानिक सल्लागार दिनेश नाईक,सौ.कपिला मुठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यात रणजित महाजन,


अमळनेर शहरात या सेवेचा शुभारंभ स्वामी नारायण चौकात करण्यात आला.यावेळी प्रथम पाच ग्राहकांचा बॅंकेचे स्थानिक सल्लागार दिनेश नाईक,सौ.कपिला मुठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यात रणजित महाजन,
अरविंद मुठे,लक्ष्मणदास मोटूमल,प्रमोद पाटील,बळवंत भिडे या ग्राहकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर शहरात कचेरी रोड,सुभाष चौक,महाराणा प्रताप मार्ग,मंगलमुर्ती चौक या भागात थांबून फिरत्या एटीएम सेवेचा लाभ देण्यात आला.
जळगाव येथून या वाहनासोबत अक्षय जोशी,प्रसाद मंडोरा,देवेंद्र चौधरी,दिपक चव्हाण हे कर्मचारी आले होते. तर अमळनेर शाखेतील शाखाधिकारी गजानन खोरखेडे,सतिष ठाकूर,
सौ.उज्वला लांडगे,दिपक कुळकर्णी, हरीष अहिरराव,समाधान पाटील,अमित जोशी यांनी सहकार्य केले.
No comments
Post a Comment