शेतक-यांचा मका व कापूस खरेदी करा अन्यथा प्रती क्विंटल अनुदान द्या - मागणी बाजार समिती संचालक पराग पाटील यांचे तहसिलदारांना निवेदन

Thursday, June 25, 2020

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------------
             - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
  राज्य शासनाने मका व कापूस खरेदी शासनाच्या संबंधित विभागाकडून सुरू केली होती. काही दिवस खरेदी प्रक्रिया सुरू होती. पण गेल्या अनेक दिवसांपासून मका व कापूस खरेदी बंद आहे.शासनाने ही खरेदी सुरू करावी अन्यथा शेतक-यांना क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावे अशी मागणी अमळनेर बाजार समितीचे संचालक पराग पाटील यांनी केली आहे. 
        शासनाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत मका खरेदी तर कापूस फेडरेशनमार्फत कापूस खरेदी तालुका स्तरावरील केंद्रात सुरू करण्यात आली. पण काही दिवसातच खरेदी बंद करण्यात आली.अजूनही शेतक-यांच्या घरात मका,कापूस शिल्लक आहे.शासन खरेदी सुरू करत नाही आणि व्यापारी योग्य किंमतीत आपला माल घेण्यास तयार नाही. तरी या मालाची शासनाने खरेदी करावी व शेतकरी वर्गास दिलासा द्यावा अशी मागणी अमळनेर बाजार समितीचे संचालक पराग पाटील यांनी केली आहे. जर शासनास हा शेती  माल खरेदी करायचा नसेल तर मका व कापूस उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावे अशी मागणीही त्यांनी  निवेदनाद्वारे केली आहे. शेतकरी हवालदिल झाला असून  आज पराग पाटील यांनी भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील,दिनेश माळी,रामलाल पाटील यांच्यासह तहसिलदार मिलिंद वाघ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील,कृषी मंत्री,पणन मंत्री आ.अनिल पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. शासनाने या महत्वाच्या प्रश्नावर कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
----------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines