राज्यात २८ जूनपासून सलून व जीम सुरू करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल आ.अनिल पाटील यांनी मानले शासनाचे आभार

Thursday, June 25, 2020

/ by Amalner Headlines
--------------------------------------------------------------------
             - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
मुंबई / अमळनेर -
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले सलून व जीम पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या  बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला  आहे. येत्या २८ जूनपासून सलून सुरु होतील अशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.सलून सुरू करण्याच्या मागणीसाठी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कालच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबई येथे भेट घेतली होती.  
      राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.महत्त्वाचं म्हणजे सलून चालकांना फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.याबाबतचे नियम जारी करण्यात येणार आहे. कटिंग करणारा व ग्राहक दोघांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.याचप्रमाणे जीम सुरू करण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. 
ना.अनिल परब यांनी निर्णयाबद्दल बोलताना सांगितलं की, २८जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी नाही.
आ.पाटील यांनी मानले आभार
     राज्यात नाभिक व्यावसायिक सलून सुरू करण्याची मागणी करत होते. परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. अमळनेर येथील दुकानदारांनी आ.अनिल पाटील यांना भेटून दुकाने उघडण्याबाबत मागणी केली होती. त्यामुळे आ.पाटील यांनी मुंबईत वरिष्ठांच्या भेटी घेऊन सलून सुरू करण्यासाठी  परवानगीची मागणी केली होती.आज झालेल्या बैठकीत या विषयास मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल आ.पाटील यांनी शासनाचे आभार मानले आहे. तसेच टॅक्सी धारकांना व प्रवासी वाहतूक करणा-यांच्या प्रवासी संख्या वाढविण्याच्या विषयावर देखील चर्चा केली आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल असे आ.अनिल पाटील यांनी सांगितले आहे.
---------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines