पातोंडा जि.प.शाळेच्या संरक्षण भिंतीचे मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन

Friday, July 17, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
तालुक्यातील पातोंडा येथील जि.प.शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
         जि.प.शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल व पुर्ण काम करण्यात निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन आ.अनिल पाटील यांनी दिले होते. त्यानुसार या कामासाठी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या निधीतून काम पूर्ण होईल. तसेच  मुला - मुलींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊ असेही आ.अनिल पाटील यांनीसांगितले.
तर गावाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले शाळा संरक्षण भिंतीच्या कामाचे आज भूमिपूजन होत आहे हा सुवर्णक्षण असल्याचे संदीप पवार यांनी सांगितले.
         या कार्यक्रमास ग्रा.पं.च्या  
सरपंच सौ.रेखाताई किशोर मोरे पाटील, उपसरपंच सोपान भाऊ लोहार, संदीपराव भगवंतराव पवार,पं.स.सदस्य प्रवीण पाटील,
निवृत्ती बागुल,विनोद जाधव, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक व महिला प्रदेश सचिव सौ. रिताताई बाविस्कर, काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, कार्याध्यक्ष सुरेश तात्या पाटील, दापोरीचे माजी सरपंच  एल.टी.नाना पाटील यांच्यासह दिलीप बिरारी (अध्यक्ष शा.व्य. समिती) श्री.जयवंतराव पवार,श्री.विनोद पवार,श्री.प्रशांत पवार,श्री.राजेंद्र यादव,श्री.प्रवीणबिरारी,श्री.अशोक पवार,श्री.रमेश ठाकरे,श्री‌ गजानन बिरारी,श्री.राहुल पवार,श्री.सयाजी भगत, श्री. गणेश पवार, कु. चैताली बाविस्कर, श्री. राजन पाटील श्री.वाल्मिक पवार श्री.मगन बोरसे, श्री.मेहरू पवार, श्री.प्रवीण लाड, श्री.राजेद्र यादव, श्री.तोताराम बहिरराव, श्री.  श्री.माळी सर मुख्याध्यापक श्री. विलास चव्हाण सर, माजी सरपंच प्रवीण सर, माजी सरपंच श्री. संभाजी विक्रम बिरारी,श्री.मेघराज पाटील, आबाजी, श्री. सयाजी बोरसे आणि मुख्याध्यापक शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चव्हाण गुरुजी यांनी केले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines