अमळनेर मतदार संघातील १० मंडळांना ६३.८६ कोटी पीक विमा रक्कम प्राप्त पारोळा तालुक्यातील दोन मंडळांना देखील कापूस पिक विम्याचा लाभ जिल्ह्यात सर्वात अधिक अमळनेर मतदारसंघात आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने यश - शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील

Thursday, July 16, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - 
तालुक्यासह मतदार संघातील पारोळा तालुक्यातील दोन मंडळांना देखील कापूस पिक विम्याचा लाभ झाला असून एकूण १० मंडळात ६३.८६ कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा अमळनेर मतदारसंघात मिळाला आहे हे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे पत्रक शिरूड येथील शेतकरी नेते प्रा.सुभाष पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 
          अमळनेर मतदारसंघातील जनतेने यावेळी खराखुरा भूमिपुत्र असलेला आमदार निवडून देत बाहेरच्या उप-यांना जोरदार दणका दिला. मतदारसंघात बाहेरचे उपरे आमदार असल्याने गेली पाच वर्षे शेतकरी वर्ग पीक विमा व नुकसान भरपाई यापासून मोठ्या प्रमाणावर उपेक्षित होता. त्यामुळे गेली चार वर्षे देखील दुष्काळी निघाली मात्र शेतकरी वर्ग विविध नुकसान भरपाई पीक विमा यापासून वंचित राहिला. यावेळी स्थानिक जनतेने भूमिपुत्र आमदार विजयी केला तसा पाऊसही विक्रमी पडला. त्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले.  अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस झाला. महसूल व कृषी आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांना थेट बांधावर पाठवत पंचनामे झाले. वेळेवर प्रस्ताव पाठवले आदी कामे अचूकपणे आमदार अनिल पाटील यांनी स्वतः लक्ष देऊन केल्याने हे यश प्राप्त झाल्याचे प्रा. सुभाष पाटील यांनी सांगितले.
       अमळनेर महसूल मंडळात ८  मंडळासाठी ५३ कोटी ३७६ लाख तर पारोळा महसूल मंडळात बहादरपुर व शेळावे मंडळातील शेतकऱ्यांना १० कोटी १० लाख रुपये रक्कम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. तर पारोळा तालुक्यातील शेळावे व बहादरपुर मंडळ मिळुन एकुण १८९० हेक्टर क्षेत्रातील ५२९० शेतकऱ्यांना लाभ प्राप्त झाला आहे. तर 
अमळनेर तालुक्यातील ८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एकूण २४ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रातील २५ हजार १२५ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतत अवर्षणप्रवण व अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने ही रक्कम मिळाली असून आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी बसलेला फटका व चार वर्षे सहन केलेला दुष्काळ यात मोठा दिलासा मिळाला आहे.

*मंडळनिहाय मिळालेला पीक विमा* 

अमळगाव २२ हजार ५५९ हेक्टरी रक्कम

अमळनेर २३ हजार ८१५ हेक्टरी रक्कम

भरवस २१ हजार २९३ हेक्टरी रक्कम

मारवड २२ हजार ४६७ हेक्टरी रक्कम

नगाव २३ हजार ३१० हेक्टरी रक्कम

पातोंडा २३ हजार २७० हेक्टरी रक्कम

शिरूड २१ हजार ४६८ हेक्टरी रक्कम

वावडे २२ हजार ४०१ हेक्टरी रक्कम

बहादरपूर १५ हजार २७१ हेक्टरी रक्कम

शेळावे १८ हजार ८६ रुपये हेक्टरी रक्कम
        अशी रक्कम मिळाल्याची माहिती प्रा. सुभाष पाटील यांनी दिली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines