-------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांची जळगाव येथील सेवक सेवा भावी संस्था यांनी महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर पुरस्कार हा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दरम्यान आपत्ती व्यवस्थापन काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.यात अमळनेर तालुक्यातुन प्रा.जयश्री दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रा.जयश्री दाभाडे या कोव्हीड - १९ च्या आपत्ती व्यवस्थापन काळात सातत्याने कार्यरत आहेत. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी ७ लोकांचे गरीब आणि गरजू कुटुंब देखील दत्तक घेतले आहे. त्याच प्रमाणे अत्यन्त जलद आणि विश्वसनीय बातम्या त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनते पर्यंत पोहचविल्या आहेत. आपल्या दमदार लेखनीच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या व प्रश्न रोखठोक पध्दतीने मांडले आहेत. फक्त पत्रकारिता न करता त्या पलीकडे जाऊन सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याकडे त्यांचा कल असतो त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन काळात त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न समस्या सोडविल्या आहेत. अमळनेर येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट देत पॉझिटिव्ह रुग्ण आणि कोरेन्टाईन संशयित रुग्णयांच्याशी
सातत्याने संवाद साधत असून त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कोव्हीड - १९ च्या आपत्ती व्यवस्थापन काळात कौटुंबिक हिंसाचार आणि समस्या वाढल्या आहेत या अनुषंगाने प्रा. जयश्री दाभाडे ह्या येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आज पर्यंत अनेक महिलांच्या समस्या सोडविल्या असून महिलांचे समुपदेशन करत आहेत. याच बरोबर आपले शैक्षणिक कार्य देखील करत आहेत.राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय, राज्य पातळीवर ऑनलाइन वेबिनार मध्ये सहभागी होत आहेत. तर राज्य पातळीवरील वेबिनारमध्ये संशोधक वक्ता व की नोट स्पीकर म्हणून कोव्हीड आजारासंदर्भात माहिती देऊन समुपदेशन केले आहे.
प्रा.दाभाडे यांच्या विविध कार्याची दखल घेत सेवक सेवा भावी संस्थेने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरविले असून या संदर्भाचे निवड पत्र प्रा. दाभाडे यांना दिले आहे. लवकरच प्रमाणपत्र,मानचिन्ह देऊन त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, व्यापारी वर्गातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
No comments
Post a Comment