शेतकऱ्यांचा कापूस पीक विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा - आ.अनिल पाटील

Wednesday, July 15, 2020

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------------
         - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------
अमळनेर -
तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासन दरबारी प्रश्न लाऊन धरला होता त्याला उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी चर्चा करून सतत उपेक्षित असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कापसाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा लाभला आहे. कापूस पीक विमा मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथून दिली आहे.
            जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली,अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. सतत चार वर्षे दुष्काळ असूनही कधी विमा मिळाला नाही अशी स्थिती असतांना आमदार झाल्यानंतर अनिल पाटील थेट बांधावर गेले. महसूल व कृषी अधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जाऊन शेताचे थेट पंचनामे करून त्याचे प्रस्ताव तातडीने शासन दरबारी पोहचवण्याचे प्रयत्न केले.  यासाठी शासन दरबारी याबाबत चर्चा व पाठपुरावा सुरू ठेवला होता.
        सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना मानगुटीवर बसल्याने हा प्रश्न लांबणीवर पडला होता.मात्र सतत दरफेरीला आमदार अनिल पाटील यांचा पाठपुरावा सतत करत होते. तालुक्यातील पिकांची, कापसाची नुकसान भरपाई, कापूस विमा याबाबत शेतकऱ्यांसाठी सदैव झटणारे शेतकरी व काँग्रेस मित्रपक्ष नेते प्रा.सुभाष पाटील यांनी आमदार पाटील यांच्याकडे सारखा तगादा लावला होता. आमदार अनिल पाटील देखील सातत्याने पाठपुरावा करत होते. शेतकरी वर्गास नुकसान होऊनही पीक विमा मिळत नाही याबाबत आमदार पाटील तगादा लावत होते. मात्र कोरोना परिस्थिती लॉकडाऊन या काळात प्रशासन व शासन यांचे लक्ष कोरोनाकडे असतांना वेळ जात होता. अखेर आमदार पाटील यांनी अजित दादा पवार व कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा करून चर्चा करून याबाबत आग्रह धरला होता. अमळनेर तालुक्यातील म गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी आग्रही मागणी लावून धरली होती. 
असा मिळणार विमा
        तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुलै २०१९ मध्ये हेक्टरी १८०० रुपये भरले होते. तालुक्यातील २५ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० ते २३ हजार रुपये प्रमाणे पीक विमा मंजूर झाला आहे. तालुक्यातील शिरूड, वावडे, भरवस, मारवड, अमळगाव, पातोंडा, नगाव, अमळनेर या आठही मंडळातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
            यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका कृषी अधिकारी भरत वारे , पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.
------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines