---------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
अंदाजित ४०० फुट लांब,६ फुट रुंद व ५ फुट खोलीच्या या गटारीमध्ये गंगाघाट परिसर, न्यु प्लॉट परिसर व इतर क्षेत्रातून आलेल्या उपगटारी मोठया गटारीस मिळालेल्या आहेत. परंतु सदरच्या नाला - कम गटारीचा गाळ २० ते २२ वर्षापासून काढलेला नसल्याने पावसाळयाच्या दिवसात पाऊस आल्यास गंगाघाट व भाजीमार्केट परिसरात रस्त्यावर ३ ते ४ फुट इतके पाणी साचून व्यापा-यांच्या दुकानात पाणी शिरते व आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य देखील धोक्यात येत होते.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी या भागात नगरसेवक, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता व आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. पाण्याचा निचरा होण्यांसाठी या गटारीवर झालेली अतिक्रमणे काढून गाळ काढण्याचे काम व गटारीचा मार्ग सरळ करण्याबाबत नगरपरिषदेस सुचविले. त्यानुसार लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या आदेशावरुन कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी सदर कामाचे तातडीने आदेश दिले असून सदर गटारीतून आजतागायत १५० ट्रॅक्टर गाळ व साधारणत: ८ ट्रॅक्टर झाडे - झुडपे काढलेली आहेत. व सदर गटारीस मिळणाऱ्या उप-गटारीचा मार्ग हा वळणदार असल्याने पाण्याचा निचरा सहजरित्या होणेकामी विजय मेडिकल पासून उत्तरेस भूमीगत गटार टाकण्याचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहे. तरी या सदर कामाबाबत व्यापारी व नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.सदर कामाची मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पाहणी केली.




