केंद्र शासनाच्या गाय - म्हैस खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -भैरवी वाघ-पलांडे शेतीसोबत पूरक व्यवसायासाठी केंद्र सरकारने सुरू केली योजना

Saturday, July 4, 2020

/ by Amalner Headlines
------------------------------------------------------------------------
           - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीसोबतच  दुग्धव्यवसायासारखा जोडधंदा सुरु करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ह्या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांनी केले आहे .
शेतीपूरक व्यवसायाची संधी
         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीसोबतच  दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा सुरु करण्याच्या उद्देशाने संकरित गायी खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.ही योजना नाशिक विभागातील ३० सहकारी दूध संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून तालुक्यात ही योजना जळगांव जिल्हा सहकारी दूध संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
असा मिळेल योजनेचा लाभ
      पंतप्रधान किसान योजना ह्या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड  वाटप करण्यात आले आहे.त्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा तात्काळ लाभ मिळणार आहे.शिवाय जे शेतकरी सहकारी दुध उत्पादक सोसायटीला दूध पुरवठा करीत असतील त्यांनी सोसायटीचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र या योजनेच्या लाभासाठी सादर करणे बंधनकारक आहे.ही योजना सर्व सहकारी व राष्ट्रीयकृत बँकामध्ये लागू करण्यात आली असून तालुक्यातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दुध संघाच्या संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांनी केले आहे.
----------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines