अमळनेर - शहरातील स्टेशन रोडवरील मुठे चाळ,मिल चाळ या प्रभागात साफसफाई व स्वच्छता करण्यात येत नसल्याबाबत या भागातील नागरिकांनी नपाच्या मुख्याधिकारी यांना सह्यांचे निवेदन दिले असून कार्यवाहीची मागणी केली आहे.
नपाच्या प्रभाग क्र.६ मधील नागरिक हे कायम स्वरूपी रहिवासी असुन सदर वार्डामध्ये अनेक दिवसांपासून स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले नाही. ब-याच महिन्यापासुन सदर वार्डातील सफाई कर्मचारी यांना गटारी साफ करण्यासंदर्भात वारंवार विनवण्या केल्या असता देखील संबधीत सफाई कर्मचारी हेतुपुरस्कर सदर वार्डामध्ये कामास येत नाहीत.याबाबत आम्ही या भागातील मुकादम श्याम महाजन यांना ब-याच वेळा तोंडी तक्रार केली असता, ते स्पष्ट उत्तर देतात की,आम्ही सरकारी कर्मचारी आहोत. आम्हाला ज्यावेळेस टाईम मिळेल त्या वेळेस आम्ही तेथे सफाई कर्मचारी पाठवू , या व्यतिरिक्त तुम्हांस जे करायचे असेल ते बिनधास्त करा,आम्ही कुणाचे बांधील नाही,असे सतत उत्तरे देत आहेत.आज रोजी सदर वार्डातील परिस्थिती बघीतली असता, सदर गटारीचे व संडासांची जी दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.
तरी सदर बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनतेचे जिवितास तसेच आर्थीक नुकसान होऊ नये या कारणास्तव मुख्याधिकारी महोदयांनी सदर बाबींकडे गांभीर्याने लक्ष दयावे. असे न झाल्यास भविष्यात सदर ठिकाणी रोगराई पसरू शकते. प्रशासनाच्या हेतुपुरस्कर दुर्लक्षामुळे सदरची रोगराई पसरली असे गृहीत धरले जाईल. व आम्हांस नाईलाजास्तव शासनांच्या विरोधात योग्य ते पाऊल उचलावे लागेल. तरी सदर अर्जाचे गांभीर्य बघून सदर वार्डातील सफाई कर्मचारी तसेच मुकादम यांची तात्काळ बदली करुन दुसरे कर्मचारी व मुकादम देण्यात यावे. जेणेकरुन सदर वार्डाची दुर्दशा होणार नाही व घाणीचे साम्राज होणार नाही यांची तात्काळ नोंद घ्यावी असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. मिल चाळ,मुठे चाळ परिसरातील नागरिकांनी नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
No comments
Post a Comment