कर्नाटकातील "त्या" जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित करा अमळनेरात महाविकास आघाडीचे तहसिलदारांना निवेदन

Tuesday, August 11, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
कर्नाटकातील बेळगांव जिल्ह्यातील मनगुत्ती गांवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुन्हा त्या जागेवर तातडीने पुनर्स्थापना करावी अशी मागणी अमळनेर येथील महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. तसेच  पुतळा हटवला म्हणून कर्नाटकातील भाजपा शासनाचा निषेध करण्यात आला. 
                   नुकताच दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा कर्नाटकातील भाजपाच्या स्थानिक प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात रात्रीतून हलवला. त्यामुळे कर्नाटकसह महाराष्ट्रात त्याचे शिवप्रेमी नागरिकांमध्ये तिव्र पडसाद उमटले.आज अमळनेर शहरातील शिवसेना,कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ह्या महाविकास आघाडीतर्फे येदुरुप्पा सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा त्या जागेवर स्थापना करावा अशी मागणी करण्यात आली.
       तसेच शिवसेनेचे उपनेते व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर नारायण राणे यांचे थिल्लर सुपुत्राने जे घाणेरडे आरोप केलेत त्याचा निषेध करून नामदार गुलाबभाऊ हे शिवसेनेचे निष्ठावंत मावळे असून शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत.
तुमच्या राणे परिवारा सारखे दलबदलू कावळे नाहीत ह्यापुढे आरोप करतांना विचार करा अन्यथा शिवसैनिकाशी आपली गाठ आहे असा ईशाराही राणे पुत्रांना दिला. सदर प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील,शहरप्रमुख संजय पाटील,श्रीकांत पाटील युवासेना उप जिल्हाध्यक्ष, महेश देशमुख, राष्ट्रवादीचे मुक्तार खाटिक,सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील,भरत पवार, सुभाष देसले, शिवसेनेचे देवेन्द्र देशमुख,नितीन निळे, प्रताप शिंपी नगरसेवक,संजय भिल नगरसेवक, जिवन पवार ,मोहन भोई, चंद्रशेखर भावसार, रमेश पाटील,सनी गायकवाड, सरपंच सुरेश पाटील हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines