अमळनेर - येथील लोक संघर्ष मोर्चासह आदिवासी पारधी विकास परिषद,राष्ट्र सेवा दल मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन या संघटनांनी आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकाजवळ शारीरिक अंतर पाळत,सर्वांनी मास्क लावून आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिवस क्रांतिकारक स्मारक पुजन करुन साजरा केला. तसेच आज रोजी भारतातील दोनशे संघटनांचे समन्वय असलेल्या
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीशी संलग्न होऊन आज रोजी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान मुक्ती दिवस ही साजरा करण्यात आला. किसान मुक्ती दिनाच्या निमित्ताने नियोजित आंदोलन सुरूवात होण्या आधीच अमळनेरचे तहसिलदार श्री मिलिंदकुमार वाघ आंदोलन स्थळी निवेदन घ्यायला आले व आंदोलनकर्त्यांनी शेतकर्यांच्या खालील विषयांबाबतचे निवेदन महिला कार्यकर्त्या भारती गाला, नंदाबाई मावळे यांच्या हस्ते तहसिलदारांना दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्या
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात सरकारने आदिवासी शेतक-याला अजूनही शेतीचा मालकी हक्क दिलेला नाही.तरी आमचे प्रलंबित वनदावे त्वरित मंजूर करावे, आमच्या वनपट्टे धारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्र शेती विकास करण्यासाठी योजना जाहीर करावी, शेतीचे कर्ज माफ करा,आमच्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी, वीजेचे बिल माफ करावे, डीझेलच्या
किंमती निम्म्याने कमी करावे, रोजगार हमी योजनेतून आमच्या शेती सुधार साठी पूर्ण २०० दिवसांचा रोजगार द्यावा,आमच्या शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव सक्तीने लागू करावा, सरकार शेतकरी आणि आदिवासींच्या विरोधात कायद्यात बदल करीत आहे यात आमचे जल,जंगल आणि शेत जमिनी आमच्या मर्जीच्या विरुद्ध कंपन्यांना विकत घेता येतील व आम्हाला हुसकावून लावले जाईल असे कायद्यात बदल केले जात आहेत त्याला आमचा पूर्ण विरोध असून आम्ही त्याविरुद्ध तीव्र आंदोलन करू म्हणून असे सर्व बदल व नवीन कायदे रद्द करावेत, खतांचा काळाबाजार तात्काळ बंद करावा व सर्वांना खते वाटप करावेत, कापूस व मका खरेदी तात्काळ सुरू करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या पदाधिका-यांची उपस्थिती
या मागण्यांबाबतचे निवेदन तहसिलदार मिलिंद वाघ यांना देतेवेळी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अशोक पवार सर, संदीप घोरपडे सर,पन्नालाल मावळे, मधुकर चव्हाण, सुधाकर पारधी, रियाजभाई शेख, भारतीताई गाला,नंदाबाई मावळे, अॅड.शकील काझी, बन्सिलाल भागवत, राजेद्र चव्हाण,अॅड. रज्जाक शेख, प्रकाश पारधी, कमाल भाई, शेरखाँ पठाण, जगन्नाथ सोनवणे, संदिपसुर्यवंशी,अविनाश पवार,आविद मिस्री, गुलाब साळूंके, सुनिल चव्हाण, समाधान दाभाडे, सागर पारधी, शांताराम चव्हाण, गणेश चव्हाण, शाहरुख भाई गायक, बालिक पवार, सचिन पारधी, दुष्यंत बोरसे, दिपक चव्हाण, विक्की साळूंके यांचेसह लोकसंघर्ष मोर्चासह आदिवासी पारधी विकास परिषद, राष्ट्र सेवा दल, मुस्लिम युथ सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजर राहून जागतिक आदिवासी दिवस व किसान मुक्ती दिवस साजरा केला.
No comments
Post a Comment