अमळनेर - शहर व तालुक्यात सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू आहे. अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात व्हेंटीलेटर नसल्याने येथील रुग्णाना जळगांव येथे रवाना करावे लागत होते. त्यास अनुसरून खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या कडे माजीआमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने ग्रामीण रुग्णालयातच व्हेंटीलेटर उपलब्ध व्हावे म्हणून मागणी लावून धरली होती.त्या अनुषंगाने पी.एम. केअर फंडातून अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी तात्काळ ५ व्हेंटीलेटर उपलब्ध करून दिल्या बद्दल मा.आमदार शिरीषदादा चौधरी यांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांचे भ्रमणध्वनीवर आभार मानले आहेत. तर मित्र परिवार आघाडीचे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी, नगरसेवक धनुभाऊ महाजन, बाळासाहेब संदानशिव यांनी खा.पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले आहेत. या प्रसंगी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार देखील उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment