अमळनेर - तालुक्यातील शेतक-यांना मागील वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीची भरपाई द्यावी व पोलीसांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थाने त्यांना देण्यात यावी यासाठी आज दि.१५ ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा मा.आ.साहेबराव पाटील व तालुका कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. या मागणीवर वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली आहे. योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्याने आज पासून होणारे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती मा.आ.साहेबराव पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे.
शेतक-यांना देय असलेले अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्यावर तातडीने देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. तर पोलीस निवासस्थाने त्वरित हस्तांतरण व वाटप करावे या बाबत पुन्हा मागणी केली आहे. सध्या सर्वत्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शासन या आजाराचा पराभव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आजपासून उपोषणाचा निर्णय दि.२ ऑक्टोबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे असे मा.आ.साहेबराव पाटील यांनी जाहीर केले आहे.
No comments
Post a Comment