अमळनेरात विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा

Sunday, August 9, 2020

/ by Amalner Headlines
प्रा साळुंके यांनी क्रांतिवीर समशेरसिंग सिंग पारधी स्मारक ठिकाणी बसण्याचे बाक दिले भेट....
अमळनेर -  विश्व आदिवासी दिवस आज अमळनेर येथे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सकाळी सर्व आदिवासी पारधी बंधू भगिनींनी आप आपल्या घरा समोर रांगोळी काढून आजच्या दिवसाला सुरुवात केली.अमळनेर येथील क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाच्या स्थळी सुशोभीकरण करण्यात आले होते. येथे रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती.
स्मारकास अभिवादन
      
    आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा.जयश्री दाभाडे यांनी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकाच्या स्थळी बसण्याचे दोन बाक आज भेट म्हणून दिले.आज या बाकांचा लोकार्पण सोहळा पार पडला.प्रा जयश्री दाभाडे यांनी सर्व प्रथम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मरकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
वृक्षारोपण
 
                विश्व आदिवासी दिनानिमित्ताने ढेकू रोडलगत असलेल्या टेकडीवर वृक्षारोपण देखील करण्यात आले. आदिवासी हा निसर्ग पूजक आहे.निसर्गाचे संवर्धन,संरक्षण करणे, जतन करणे आदिवासींचे आद्य कर्तव्य आहे आणि या दृष्टीने आज नवनाथ टेकडीवर २५ झाडांचे रोपण करण्यात आले.यात वड,पिंपळ,उंबर,निंब,आंबा या पर्यावरणीय संवर्धन दृष्टीने परिणामकारक आणि आरोग्यदायी वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा,पत्रकार  प्रा.जयश्री दाभाडे,संजय पारधी,पंडित पारधी,बबलू पारधी,
धनराज पारधी,अनिल पारधी,मनोज पारधी,पुनमचंद पारधी,नूरखान,हिम्मत दाभाडे,आप्पा दाभाडे,जय पारधी,विनायक पाटील,मयूर साळुंके,भूषणपाटील,प्रमोद,पाटील,हितेश पवार इ उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines