अमळनेर - येथील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष व खान्देश शिक्षण मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी डिगंबर महाले यांची निवड झाली आहे.
आज दि.११ रोजी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात ऑनलाइन पद्धतीने लायन्स क्लबचा पदग्रहणसोहळा झाला. यावेळी मावळते अध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी श्री महाले यांच्याकडे, मावळते सेक्रेटरी प्रसन्न पारख यांनी विनोद अग्रवाल यांच्याकडे, तर मावळते ट्रेझरर अजय हिंदुजा यांनी कुमारपाल कोठारी यांना पदभार सोपविला. यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन योगेश मुंदडे यांची विशेष उपस्थिती होती. क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्वांचा शपथविधी करविला.
क्लबचे २०२०-२१ साठीचे पदाधिकारी असे :-
अध्यक्ष डिगंबर महाले,फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट- विनोद अग्रवाल,सेकंड व्हाईस प्रेसिडेंट- योगेश मुंदडे ,थर्ड व्हाईस प्रेसिडेंट दिलीप गांधी,सेक्रेटरी- विनोद अग्रवाल,जॉईंट सेक्रेटरी -अनिल रायसोनी, ट्रेझरर- कुमारपाल कोठारी,जॉईंट ट्रेझरर- पंकज वाणी,टेमर- राजेश नांढा, टेल ट्विस्टर- महेंद्र पाटील.
अनेक मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना कार्यकाळाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments
Post a Comment