धरणगाव येथे गुटख्यासह २३ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त - महिन्यात दुसरी कारवाई ट्रक ताब्यात व दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, August 12, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
तालुक्याच्या शेजारी असलेल्या धरणगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधित गुटखा व ट्रक असा सुमारे २३ लाख ३३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला असून ट्रक जप्त केला आहे. महिनाभरात धरणगाव येथेच स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही दुसरी कारवाई आहे.
जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव हद्दीत काल रात्री अवैधपणे गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला. यावेळी ट्रकमध्ये सुगंधित गुटखा आढळून आला. पोलीसांनी शेख रफिक शेख रज्जाक (वय ४९,रा.धरणगाव) व कपिल रविंद्रसिंह राजपूत यांचेविरूध्द गुन्हा दाखल केला असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व स्था.गु.
शाखेचे पो.नि.बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे,एएसआय अशोक महाजन, नारायण पाटील,पो.हे.काँ.रामचंद्र बोरसे,रवींद्र घुगे,पो.ना.मनोज दुसाने,महेश महाजन,पो.काँ.परेश महाजन,पो.काँ.दीपक शिंदे, दिपक पाटील, प्रविण हिवराळे,मुरलीधर बारी,पो.ना.रफिक शेख कालु पो.ना.दिपक सुरवाडे यांनी सदर कारवाई केली.
पोलिसांनी अवैध गुटखा ट्रकसह त्याब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध धरणगाव पोस्टेला भाग ५ गु.र.नं. १५९/२०२० भादंवि कलम ३२८,१८८,२७२,२७३ साथीचे रोग अधिनियम ३ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
मागील काही दिवसापूर्वी देखील धरणगाव येथेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर येथील व्यापा-याचा गुटखा जप्त केला होता. महिनाभरात ही दुसरी कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही जिल्ह्यात गुटखा बाजार तेजीत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात कुणावर प्रकाश पडेल हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines