अमळनेर - तालुक्यातील १० मंडळातील शेतकऱ्यांना ६३.८६ कोटी रुपये पीक विमा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर करून दिल्याबद्दल व पिक विमा मंजुरीसाठी आमदारांकडे व शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याबद्दल आमदार अनिल पाटील व प्रा.सुभाष पाटील यांचा फाफोरे येथे शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारवड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी.ओ. संदीप वायाळ, उपप्राचार्य शाम पवार, प्रा.सुरेश पाटील,एल.टी.नाना पाटील,राजू फाफोरेकर,सरपंच जितेंद्र पाटील, विकासो चेअरमन अनिल नाना, बाळासाहेब आधार पाटील, बाबुराव पाटील, मयुर पाटील, दिनेश पाटील, जी.एस.
पाटील सर, सुरेश पाटील, प्रविण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुदाम पाटील व सर्व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना आमदार अनिल पाटील म्हणाले की, पाच वर्ष गावाला विकास कामे कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. गावातील प्रलंबित व विकासाला चालना देण्यासाठी बोरी नदीवरील अपूर्ण असलेला फाफोरे बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी शासन पातळीवर योग्य तो पाठपुरावा केला जाईल. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भोकरबारी धरणावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करून गावाला टंचाईमुक्त केले जाईल. गावाच्या शेतशिवारात असलेले शेतरस्ते पालकमंत्री पानगळ योजनेतून मंजूर करण्यास प्राधान्य देऊन कामे केली जातील. तसेच आदिवासी बांधवांसाठी समाजोपयोगी कामासाठी आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृह तात्काळ मंजूर करून लवकरच भूमिपूजन केले जाईल असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी मनोगत द्वारे व्यक्त केले.
No comments
Post a Comment