अमळनेर - शहरातील तांबेपुरा - सानेनगर भागातील सुप्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरास आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली. त्यात सानेनगर भागाच्या समस्या जाणून घेत लवकरच सिद्धेश्वर मंदिर घाटाचे काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

यावेळी कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. बोरी नदीतून पलीकडे शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी नदी पार करावी लागते. बोरी नदीला पूर आल्यानंतर शेतकरी बांधवाना पलीकडे जाण्यासाठी जागा नसते व शेतात जाण्यासाठी समस्या निर्माण होत असते. आ.पाटील यांनी या समस्येविषयी माहिती घेतली. यावर लवकरच काहीतरी मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले. तसेच या भागात तरुणांना व्यायामासाठी व्यायामशाळेला साहित्य उपलब्ध करण्यात येईल. तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात येणार असून स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करण्यात येतील असे आश्वासनही आ.पाटील यांनी दिले.

यावेळी नगरसेवक संतोष पाटील, महेश पाटील, रावसाहेब पहेलवान, सुभाष पवार, प्रकाश जिजाबराव पाटील, भिका नाना पाटील, सदाशिव पाटील, दिपक पवार,संजय पाटील, वसंत पाटील, प्रविण पाटील, गणेश पाटील, गुलाब पाटील, जगदीश पाटील,दादा पाटील,गोविंदा बाविस्कर व सानेनगर व परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.
No comments
Post a Comment