अमळनेर - दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूलअधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करून सन्मान करण्यात येतो. सन २०१९ - २० ह्या महसूल वर्षात देखील अमलनेर उपविभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचा- यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यात अमळनेर तालुक्यात उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल मंडळ अधिकारी श्री पुरुषोत्तम शिवाजी पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तालुक्याचे आमदार अनिल पाटील ह्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ह्यावेळी नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,उपविभागीय अधिकारी सीमाअहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मागील वर्षी देखील जिल्हाधिकारी जळगाव ह्यांच्या हस्ते उत्कृष्ट तलाठी हा पुरस्कार श्री पुरुषोत्तम शिवाजी पाटील यांना प्रदान करण्यात आला होता. ते सध्या अमळनेर तालुक्यातील नगाव बु.॥ मंडलाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
ते निवृत महसूल अधिकारी अव्वल कारकुन श्री शिवाजी मोहन पाटील यांचे चिरंजीव असून तसेच जळगाव जिल्हा ग्रामसेवक पतपेढ़ीचे संस्थापक अध्यक्ष कै.मोहन सुकदेव चव्हाण (निवृत्त ग्रामसेवक) यांचे नातू आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments
Post a Comment