अमळनेर - तालुक्यातील दहिवद येथील नवभारत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आकांक्षा पन्नालाल मावळे ही एचएससी परिक्षेत दहिवद विद्यालयासह अमळगाव केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्याबद्दल लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे व सहका-यांनी आकांक्षा हिचा घरी भेट देऊन पालकांसमवेत सत्कार केला. प्रतिभाताई शिंदे यांनी तिला भेटवस्तू दिली व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.अशोक पवार, संदिप घोरपडे,बन्सीलाल भागवत हे उपस्थित होते. आकांक्षास पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा देत कौतुक केले. कु.आकांक्षा ही सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांची कन्या आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment