अमळनेर - येथील नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम रमेशचंद अग्रवाल यांना पुणे येथील उदयकाळ फाऊंडेशनच्या वतीने कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
राधेश्याम अग्रवाल यांनी या लॉकडाऊनच्या कालावधीत नपाच्या नगराध्यक्षा,नगरसेवक, मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या पथकाच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन नागरिक व व्यापारी बांधवांनी करावे यासाठी कार्य केले आहे. याच कालावधीत शहरात वाहतूकीस अडथळा ठरणारे काही भागातील अतिक्रमण काढण्याचे आव्हानात्मक कामही वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी यशस्वी केले आहे.त्यामुळे त्या – त्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. तसेच शहराच्या बाजारपेठेत व अधिक गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन,मास्क किंवा रूमालाचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये या सुचनांचे योग्य पालन होण्यासाठी जागृती करणे व शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम राधेश्याम अग्रवाल यांनी आपल्या सहका-यांच्या सहाय्याने केले. काही प्रसंगी निर्माण झालेले वाद सामोपचाराने व चर्चेतून मिटवण्यात आले. श्री राधेश्याम अग्रवाल यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुणे येथील उदयकाळ फाऊंडेशनच्या वतीने कोविड योद्धा गौरव सन्मान पत्र देण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बागुल व सुनिल पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सन्मानाबद्दल राधेश्याम अग्रवाल यांचे मा.आ.कृषीभुषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,सर्व नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
No comments
Post a Comment