जवखेडे येथील पोलीस पाटील उल्हास लांडगे यांचे दुःखद निधन

Saturday, August 8, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - तालुक्यातील    जवखेडे येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील उल्हास लांडगे यांचे कोरोना संसर्गामुळे काल दि. ८ ऑगस्ट रोजी दुर्दैवी निधन झाले.  
          श्री उल्हास लांडगे हे एक अत्यंत मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून परिचित होते. लॉकडाऊन कालावधीत जवखेडा येथील पोलिस चेक नाक्यावर राञंदिवस पहारा देणारे एक खरा कोविड योध्दा, एक सच्चा माणूस म्हणजे उल्हास लांडगे. जवखेडे व परिसरात उल्हास बापू या नावाने त्यांची सर्वत्र ओळख होती. रूग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि हा आघात सहन करण्याची त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे स्व.उल्हास बापू लांडगे यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines