अमळनेर - तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की तालुक्यात माझा बांध माझं झाडं अभियान सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात बांधबंदिस्ती करण्यात येणार असून बांधावर आंबा,चिंच,साग,बांबू आणि इतर चोवीस प्रकारच्या झाडांची लागवड केल्यास प्रति झाड ५७० रूपये वृक्षसंगोपन करण्यासाठी मजूरीच्या व कुशल निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहेत.माझा बांध माझं झाडं या अभियानाच्या माध्यमातून मृदा व जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धन होणार असून या माध्यमातून ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन २०२२ पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि शरद पवार याचे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतीची कामे समाविष्ट करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी बांध बंदिस्तीची आणि शेतात व बांधावर वृक्षारोपण करण्यासाठी आपल्या नावाचा नरेगा आराखड्यात समावेश करण्यासाठी आपल्या स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment