अमळनेर - आधी पारोळा तालुक्यातील खेडीढोक गावात कोतवाल म्हणून तर नंतर काम तसेच गुणवत्तेच्या आधारावरून जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून अमळनेर उपविभागीय कार्यालयात बढती...असे गेल्या २४ ते २५ वर्षांपासून महसूल विभागात अत्यंत इमानदारी व निस्वार्थ सेवा देत एकनाथ मैराळे यांनी कार्य केले आहे. निवडणूक असो, नैसर्गिक आपत्ती असो, किंवा अजून काही असो. अत्यंत निस्वार्थ पणे वर्षात कधीही सुटी न घेता मैराळे यांनी महसूल विभागात सेवा दिली आहे. कोरोना काळात देखील आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने पूर्ण वेळ आपल्या कार्यालयीन कामात हजर राहिले व सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडले. म्हणून त्यांच्या कामाची दखल घेत अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या कडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या बाबत त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment