अमळनेर - सध्या कोरोनाची सम्पूर्ण भारतातील परिस्थिती बिकट आहे. कित्येक डॉक्टर्स कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. तर काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना कोरोनामूळे प्राण गमवावे लागले आहेत. तरीही वैद्यकीय कर्मचारी आपली सेवा देत आहेत. असेच अमळनेर येथील एक डॉक्टर दांपत्य तर महाराष्ट्राबाहेर कोरोना (कोविड १९) रुग्णावर उपचार करीत आहे. अमळनेर येथील डॉ. उपलेश संतोष महाजन (स्त्रीरोग तज्ञ) व डॉ.मिनाक्षी वाघ -महाजन (डेंटल सर्जन) हे दांपत्य ओडिसा राज्यात राऊरकेला या ठिकाणी इसपात जनरल हॉस्पिटल (राऊरकेला स्टील प्लांट) येथे मार्च २०२० पासून दिवस रात्र कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करीत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवानिष्ठ भावनेने काम करीत आहेत. डॉ.उपलेश हे अमळनेरचे माजी उपनगराध्यक्ष श्री.रामदास दौलत शेलकर यांचे नातू असून सौ. सुनंदा व संतोष महाजन यांचे सुपुत्र आहेत आणि डॉ. राजेंद्र शेलकर( वैद्यकीय अधिकारी न.प.अमळनेर) यांचे भाचे आहेत. तसेच डॉ. मिनाक्षी ही सौ. ज्योती व सुनील वाघ (MSEB) उर्जामित्र यांची कन्या आहे. त्याचप्रमाणे डॉ.उपलेश महाजन यांचे दोन लहान भाऊ पंकज महाजन व मयूर महाजन हे अनुक्रमे औरंगाबाद व बोकारो ( झारखंड) येथे कोरोना रुग्णावर उपचार करीत आपली सेवा देत आहेत. एकंदरीत महाजन कुटुंब या संकटकाळात देशाच्या सेवेसाठी समर्पित आहे त्यांचे हे शौर्य गौरवास्पद आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment