रामेश्वर खुर्द जिप मराठी शाळेच्या संरक्षण भिंतीचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन भानुबेन शहा गोशाळेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

Wednesday, October 14, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आ.अनिल पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. याच कार्यक्रमात अमळनेर येथील श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे उपलब्ध झालेल्या शालेय गणवेशांचे वाटप विद्यार्थ्यांना आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
                 श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे चेतन शहा, प्रा. अशोक पवार,संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत आदींनी शालेय गणवेश उपलब्ध करून दिले. मान्यवरांच्या हस्ते गणवेश व त्या सोबत वह्यांचे देखील वाटप करण्यात आले. यावेळीं आमदार अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी सरपंच गंगाराम पाटील, सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे, विक्रांत पाटील,रामकृष्ण पाटील, पुना वंजारी,सुरेश वंजारी आदींची  विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, शरद सोनवणे, मनोहर पाटील, योगेश पाटील, वैशाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines