टीडीएफ मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर जिल्ह्यातील शिक्षक गटात ईश्वर महाजन (अमळनेर), ज्ञानेश्वरी धांडे (खिरोदा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक विद्यार्थी गटातून सुवर्णा महाजन (जळगांव) यांचा समावेश

Tuesday, October 13, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
शिक्षक लोकशाही आघाडी मुंबई या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा  निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात जिल्ह्यात शिक्षक गटात  ईश्वर महाजन (अमळनेर) व ज्ञानेश्वरी धांडे (खिरोदा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.तर विद्यार्थी गटात जिल्ह्यातील सुवर्णा महाजन (जळगाव) यांचा समावेश आहे.
               निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात खुल्या गटात रंजना राजेंद्र ढवळे न्यू पनवेल यांच्या "कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती" या निबंधाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून सुजाता दत्तात्रय हनमघर मुंबई यांच्या "ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे" द्वितीय तर रवी पाटील ( प्रतिभाग्रज ) डोंबिवली यांच्या "भ्रष्टाचार निर्मुलन काळाची गरज" या निबंधाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर अण्णा मुरलीधर अभंग अहमदनगर,निमिषा प्रभाकर जाधव सिंधुदुर्ग,
ईश्वर रामदास महाजन-अमळनेर व ज्ञानेश्वरी धांडे -जळगाव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.
      तसेच इयता नववी ते बारावी या विद्यार्थी गटात प्रेरणा प्रकाश परदेशी मालेगाव यांच्या "वृक्षसंवर्धन काळाची गरज" या निबंधाला प्रथम क्रमांक मिळाला असून वैष्णव कैलास वाढेकर जालना यांच्या "कोरोनमुळे बदललेलं जग" यांना द्वितीय तर लक्षणा कदम मुंबई यांच्या "माझी आवड विज्ञान की कला" तृतीय क्रमांक मिळाला आहे तर सुवर्णा महाजन-जळगाव, वैष्णवी  बावस्कर-पनवेल, आर्या गडकर-डोंबिवली, प्रतीक सुडके-नाशिक, साक्षी गवळी निफाड, शोभा बारला-डहाणू , कोमल गोरुले-रत्नागिरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेसाठी दोन्ही गटात मिळून तीनशेहून अधिक निबंध प्राप्त झाले होते. शिवाजी कुलाल,
आश्विनी पवार,दत्तात्रय पवार व गणेश हिरवे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिल्याचे हिरवे सर यांनी सांगितले तर भविष्यातही अशा प्रकारच्या विविध स्पर्धा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जनार्दन जंगले सर यांनी दिली.विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines