अमळनेर - महाराष्ट्र राज्यात एकीकडे बार सुरू आणि मंदिरे बंद आहेत. शासनाच्या या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी अध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले.या उपोषणाला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर पाठींबा दिला. त्यानुसार अमळनेर मंडलात भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.एकीकडे सरकारने बियर बार सह अनेक गोष्टी टप्याटप्याने चालू केल्या आहेत.परंतु मंदिरे सुरू करण्याची गरज आहे.मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांसह लहान दुकानदार,फेरीवाले, व्यावसायिक,फुल-प्रसाद विक्रेते,हॉटेल,वाहतूक व्यावसायिक यांच्यासह सर्व व्यावसायिकांचे अतोनात हाल होत आहेत. काही दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय उभे केले आहेत.आता कर्जाच्या हप्त्याची फेड होऊ शकत नाही.लाखो रुपयांची उलाढाल अमळनेर येथील व्यावसायिकांची आहे.
७ महिन्यांत हजारो कोटी रुपयांपेक्षाही जास्त नुकसान झाले आहे.राज्य शासनाने मंदिर तातडीने उघडण्याबरोबरच तीर्थक्षेत्रांतील व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करणे अत्यावश्यक आहे अशी मागणी करण्यात आली.
या वेळी कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासकीय आदेशानुसार नियमांचे पालन करून भारतीय जनता पार्टी अध्यामिक आघाडी आणि वारकरी संप्रदायाच्या भाविकांसह तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,
सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील,बबलू राजपूत,राहुल पाटील,ह.भ.प. उमेशजी महाराज,अरुणजी महाराज,प्रल्हाद महाराज,भानुदास महाराज,हरीश महाराज,
शितल देशमुख,चंद्रकांत कंखरे युवा मोर्चाचे योगीराज चव्हाण,पंकज भोई,संजय एकतारे,
आयज बागवान, चेतन चौधरी,दीपक पाटील,बाळा पवार,राहुल बडगुजर, निनाद जोशी,शंतनू जोशी,कमलेश कुलकर्णी, निखिल पाटील आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment