संघटनेची जनरल सभा आज दि. १५ रोजी जळगाव जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष गुणवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मधील साने गुरुजी सभागृहात पार पडली. त्यात अमळनेर तालुका अध्यक्षपदी संजय भाईदास पाटील व सचिवपदी नितिन सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेत तालुका मानद अध्यक्ष शांतिलाल सोनवणे,कार्याध्यक्षआधारधनगर,कोषाध्यक्षआर.डी.पवार,सहसचिव पंकज पाटील,
उपाध्यक्ष विलास सोनवणे,महिला उपाध्यक्षा योगिता वसंत पाटील, प्रसिद्धि प्रमुख विलास पाटील, डिगंबर सैंदाणे, सल्लागार - डी.बी.पाटील, एच.आर.वाघ, बी.वाय.पाटील, संघटक डी.एस.
साळूखे, विठ्ठल पाटील, कार्यकारिणी सदस्य महेंद्र देसले, प्रांजल वाघ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.सदर बैठकीत ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष व जि.प.कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष दिनेश साळूखे यांचे मार्गदर्शन लाभले. तर नवनिर्वाचित अध्यक्ष,सचिव व कार्यकारिणीचे निवडीबद्दल पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी अभिनंदन केले आहे.
No comments
Post a Comment