अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांना दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच दररोजच्या व्यवहारासाठी वेळेचे बंधन निश्चित केले आहे. शासनाच्या या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नपाच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येते. नियमांचे उल्लंघन करणा-यां सहा दुकानदारांवर नपाने दंडात्मक कारवाई केली आहे.
आली आहे. तसेच दुकान बंद करताना अडथळाआणणाऱ्या एक रिक्षा चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल सह ६ दुकानदारांना दंड
अमळनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख राध्येश्याम अग्रवाल हे यश लोहरे व अविनाश बि-हाडे यांच्यासह शहरात फिरून दुकानदारांना नियमांचे पालन करण्याबाबत सांगत असतांना काही दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने निर्धारित वेळेत दुकाने बंद केली नाहीत, कोविड १९ बाबतच्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून शहरातील मनीषा किराणा, कमलेश प्रोव्हिजन,लिबर्टी टी हाऊस, प्रेम हॉटेल, खान्देश बिर्याणी, हॉटेल महाजन या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रिक्षा चालकावर गुन्हा दाखल
नपाचे अतिक्रमण पथक दि. १४ ऑक्टोबर रोजी शहरातील झामी चौक भागात निर्धारित वेळेनंतरही सुरू असलेली दुकाने बंद करत असतांना दीपक जगन भोई उर्फ बजरंग रिक्षावाला याने कामातअडथळा निर्माण केला म्हणून त्याच्या विरुद्ध कलम १८६ प्रमाणे अमळनेर पोलिस ठाण्यात अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment