अमळनेर - येथील मेहतर कॉलनी परिसरात महर्षी नवल स्वामी प्रवेशद्वाराजवळ नुकतेच वाचनालयाचे उद्घाटन आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा आणि पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे , विक्की आबा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाच्या पेटीचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रा. जयश्री दाभाडे यांनी पेपर वाचण्याचे महत्व पटवून दिले. तसेच तरुण पिढीने वर्तमानपत्र वाचून नोकरी संदर्भातील माहिती जाणून घ्यावी आणि त्या पद्धतीने सफाई कामा व्यतिरिक्त इतर नोकरी पेशा कडे वळावे.

आधुनिक स्पर्धेच्या काळात शिक्षण अत्यन्त महत्वपूर्ण असून युवा पिढीने शिक्षणाकडे वळावे असे मत व्यक्त केले. यावेळी हाथसर येथील पीडित युवती मनीषा वाल्मिकीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मेहतर समाजातील बुद्धाजी जाधव,अर्जुनजी धाप ,रवीजी घोगले,राम भैया कलोसे,विनोदजी चावरे,रमेशजी चव्हाण,सन्नीजी जाधव,डॅनीजी जेधे,
शक्तीजी दाभाडे,अजयजी धाप,
संदीप धाप,राहुल कंजर ,महेंद्र साळुंके,श्रीकांत साळुंके,भुरा पारधी आदींची उपस्थिती होती.
No comments
Post a Comment