अमळनेर - येथील श्रीमती भानूबेन शहा गो शाळेमार्फत जि.प.उच्च प्राथ. शाळा पळासदळे येथे प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा.अशोक पवार,श्रीमती भानूबेन शहा गो शाळेचे चेतनभाऊ शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील (सरपंच तरवाडे), गुलाब पाटील, उमाकांत पाटील, मुख्याध्यापक दिलीप सोनवणे, केदारेश्वर चव्हाण, अशोक ठाकूर, श्रीनिवास सोनवणे, ज्ञानेश्वर कुमावत व ग्रामस्थ मंडळ यावेळी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेंद्र सोनवणे यांनी केले.
No comments
Post a Comment