जिल्ह्यात २१ ऑक्टोंबर पर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

Wednesday, October 7, 2020

/ by Amalner Headlines
जळगाव -
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात दि.२१  ऑक्टोंबर २०२० पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines