```````````````````````````````````````````````````````````
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अमळनेर- येथील त्रिमूर्ती न्युज समुहातर्फ़े काल दि.२६ रोजी संविधान दिनानिमित्त संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली . त्यानंतर दोन महिन्यांनी दि.२६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. म्हणूनच त्याचे उत्तरदायित्व म्हणून दि. २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय मरसाळे(संपादक-खान्देश व्हिजन),सुरेश कांबळे(संपादक-दिव्य खान्देश),समाधान मैराळे
(संपादक-दिव्य लोकतंत्र) यांनी केले होते.
याप्रसंगी कॉंग्रेसचे पदाधिकारी सुभाष पाटील,पन्नालाल मावळे,बाळासाहेब संदानशिव,पंकज चौधरी,पो.ना.डॉ.शरद पाटील,अमोल माळी,शिवाजी महाजन,अबू महाजन ,भरत पवार,बाळासाहेब सोनवणे,प्रविण बैसाणे आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment