°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अमळनेर - कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासन पुन्हा एकदा याबाबत गंभीर झाले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात येत आहे.नियमांचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
आजपासून सर्व नागरिकांना मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करावे. कोरोना आजाराची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केल्याने प्रशासनाने नियम सक्तीचे केले आहेत. शहरात फिरतांना जर नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना रूपये २०० ते ५०० पर्यंत दंड होऊ शकतो. याबाबतचे निर्देश उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व नपाच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी दिले आहेत. याबाबत नपाच्या अतिक्रमण पथकास कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आले आहेत.आजही अनेक व्यापारी,व्यावसायिक व नागरिक मास्क न लावता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे उल्लंघन करीत बाजारपेठेत व इतरही सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. तरी नागरिक व व्यापारी बांधवांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment