°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अमळनेर - येथील पोलीस स्टेशन शहराबाहेर तीन ते चार किमी अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी वृद्ध ,महिला आदींना तक्रार करण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर अमळनेर शहर पोलीस चौकी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी दिली


त्यानुसार तहसील कार्यालयाजवळ शहर चौकीचे कामकाज सुरू करण्यात आली असून सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत याठिकाणी तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नवीन पोलीस स्टेशनचा अडकलेला प्रस्ताव बाहेर काढून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. डीवायएसपी राकेश जाधव यांनी कमी संख्या बळात आहे त्या परिस्थितीत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे,पत्रकार संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ,जयवंतराव पाटील,शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील , युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख श्रीकांत पाटील,नगरसेवक संजय पाटील,एपीआय प्रकाश सदगीर , डॉ.रवींद्र पाटील ,विक्रांत पाटील,भाजपचे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजू फापोरेकर हजर होते. सूत्रसंचालन व आभार पोलीस नाईक डॉ. शरद पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे,योगेश महाजन,रवी पाटील,दीपक माळी यांचे सहकार्य लाभले
No comments
Post a Comment